Type Here to Get Search Results !

आंबे येथील प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूलला ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड

चळे(दि.27)- बालाजी फुगारे 

      श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओपन नॅशनल लेव्हल अबॅकस व वेदिक मॅथ्स स्पर्धेत प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल, आंबे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाची दखल घेत श्रद्धा इन्स्टिट्यूटकडून शाळेला ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.


प्रोग्रेस स्कूल आंबे चे मुख्याध्यापक नितीन पाटील यांचा सन्मान करताना श्रद्धा इन्स्टिट्यूटचे संचालक.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील सर तसेच अबॅकस शिक्षिका अवताडे मॅडम यांचा पालकांकडून विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


प्रोग्रेस स्कूल आंबेच्या  अबॅकस टीचर आवताडे मॅडम यांचा सन्मान करताना श्रद्धा इन्स्टिट्यूटचे संचालक.

या यशामुळे शाळेचे नाव परिसरात उजळले असून, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांबद्दलची आवड अधिक वाढीस लागणार असल्याचा विश्वास संस्थाध्यक्ष सचिन पाटील व पालकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments