चळे(दि.9) बालाजी फुगारे
चळे तालुका पंढरपूर येथील प्रगतील शेतकरी औदुंबर पितांबर गायकवाड यांचे आज पहाटे अपघात मध्ये निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार,औदुंबरपापा हे मिरज येथून एका चार चाकी गाडीत त्यांच्या पत्नीला घेऊन त्यांच्या चुलत भावांसोबत चळे येथे घेऊन येत असताना टाकळी बायपास या ठिकाण अज्ञात मोठ्या कंटेनर सोबत अपघात झाल्याने औदुंबर गायकवाड यांचे निधन झाले आहे. गाडीतील इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पंढरपूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ही समजते.
औदुंबर गायकवाड यांची गावामध्ये पापा अशी ओळख होती. त्यांचा स्वभाव कष्टाळू,शांत,मितभाषी असा होता.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली,आई– वडील असा परिवार आहे. आ. अभिजित पाटील यांचे खाजगी सचिव(P.A) तेजस गायकवाड यांचे ते वडील होत. औदुंबर गायकवाड यांच्या आकस्मित अपघाती निधनाने बरड वस्तीसह संपूर्ण चळे गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment
0 Comments