Type Here to Get Search Results !

रस्ते अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू.

चळे(दि.2) - बालाजी फुगारे.

   चळे तालुका पंढरपूर येथे शुक्रवार दि.2 रोजी दुपारी 3.30 वाजता दुर्दैवी घटना घडली आहे. चळे येथील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी काँक्रीट रस्ता करण्यासाठी आलेल्या काँक्रीट मशीन टीपरच्या पाठीमागील चाकामध्ये सापडून निहार नंदकुमार सटाले(वय 6 वर्षे )या शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

      निहार गावातील एका खाजगी प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत होता.निहारच्या अकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.निहार हा ऍड.नंदकुमार सटले यांचा मुलगा आहे.

     या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात आले आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.



     

Post a Comment

0 Comments