यशवंत माने यांनी राजकारणा पलीकडे जाऊन स्नेह जपला;पक्ष सोडल्यानंतरही अजित पवारांची भेट घेत अभिनंदन केले.
पंढरपूर(दि. 4) बालाजी फुगारे.
मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने यांनी मागील आठवड्यात नुकताच भाजप पक्षामध्ये मुंबई येथे प्रवेश केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुंबई येथे भेट घेऊन अभिनंदन करत राजकारणापलीकडे जात माणसं जपण्याचे काम मा.आ.माने यांनी केले आहे.
2024 24 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ मतदार संघामधून अजित पवार गटामधून आमदार यशवंत माने यांना पुन्हा विधानसभेचे निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पक्षांतर्गत झालेल्या कुरघोडी मुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्याच पक्षातील असलेले प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात प्रचार केला होता.
त्यानंतर वर्षभरामध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहत गेले. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील विक्रांत माने माजी आमदार यशवंत माने यांच्यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हातामध्ये घेतले होते. मात्र अवघ्या आठवड्याभरामध्येच अजित पवार यांची नवीन नियुक्ती झाल्याने यशवंत माने यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले व राजकारणा पलीकडे जाऊन माणसे जोडण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले आहे.

Post a Comment
0 Comments