चळे (दि. 29) – बालाजी फुगारे
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील श्री. राहुल वसंत थिटे यांना भारत सरकारकडून पेटंट मिळाल्याची अभिमानास्पद बाब समोर आली आहे. त्यांनी विकसित केलेल्या “फ्लड रिस्क मॉनिटरिंग डिव्हाइस” या उपकरणाला हे पेटंट प्राप्त झाले आहे.
या डिव्हाइसच्या माध्यमातून पर्जन्यमानाची तीव्रता, पाण्याची पातळी तसेच मातीतील ओलावा यांचे अचूक निरीक्षण करता येते. विशेष म्हणजे, यात जीपीएस व सॅटेलाइट कम्युनिकेशन मॉड्युल्सचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे अचूक जिओ-लोकेशन मिळते. तसेच क्लाऊड-आधारित डेटा सिंक्रोनायझेशनमुळे माहिती तत्काळ उपलब्ध होते.हे उपकरण पूरग्रस्त भागातील नियोजन, संभाव्य धोका ओळखणे, स्थलांतराच्या मार्गांचे मूल्यांकन करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
फोटो – राहुल थिटे
राहुल थिटे यांचे मूळ गाव भोसे (क) असून त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले आहे. त्यांनी पदवीचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून पूर्ण केले असून सध्या ते वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर येथे पीएचडीचे शिक्षण घेत आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भोसे ग्रामस्थांसह तालुक्यातील शैक्षणिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments