पंढरपूर,(दि.23) बालाजी फुगारे
श्रीपूर येथील श्री पांडुरंग सह. साखर कारखान्याचे माजी संचालक व गादेगाव (ता.पंढरपूर) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत उर्फ भीमराव नामदेव फाटे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. 23 रोजी निधन झाले. ते 54 वर्षाचे होते.
पंचायत समितीचे माजी सभापती व पांडुरंग सह. साखर कारखान्याचे चेअरमन रामभाऊ बागल यांचे ते चिरंजीव होते. तसेच नामदेव फाटे यांचे ते दत्तक पुत्र होते. भीमराव फाटे हे परिचारक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. गादेगाव मध्ये परिचारक गट एकसंघ राहण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आहेत. गादेगाव बरोबरच आसपासच्या गावांमध्ये त्यांचा लोकसंपर्क चांगला होता.
गावासाठी सातत्याने वेळ देणारे म्हणून भीमराव फाटे यांच्याकडे पाहिले जात होते. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे ते कुशल कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने गादेगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. भीमराव फाटे यांच्या निधनाने परिचारक गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भीमराव फाटे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 सून, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment
0 Comments