पंढरपूर(दि.30) बालाजी फुगारे.
इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर अंतर्गत अंतर महाविद्यालयीन 10 मीटर रायफल/ पिस्टल शूटिंग स्पर्धेमध्ये पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील कु. ऋतुजा धुमाळ हिने पिस्टल शूटिंग या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले.
या अंतर महाविद्यालयीन शूटिंग स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 220 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधील विजेते खेळाडू हे हरियाणा येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठ राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. कु.ऋतुजा धुमाळ शूटिंग मधील सिंगल व डबल या दोन्ही खेळ प्रकारांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.ही निवड कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची बाब असून या खेळाडूला विद्यापीठ पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत,उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, डॉ. गजधाने डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, डॉ. उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य,शिक्षक कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनिल परमार, प्रा.विठ्ठल फुले, आणि प्रा.मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.
ही निवड कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची बाब असून या खेळाडूला विद्यापीठ पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments