Type Here to Get Search Results !

आमदार अभिजीत पाटील यांच्याकडून सीना नदी काठच्या गावांच्या पूरपरिस्थितीची पाहणी;सरसकट पंचनामे करण्याचे आदेश

माढा(दि.19)– प्रतिनिधी.

        राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनास तत्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन निमगाव-माढा , दारफळ, राहुलनगर, उंदरगाव- केवड , वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आज माढा तहसीलदार संजय भोसले, तालुका कृषी अधिकारी चांदने यांना सोबत घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी पाहणी केली.

    माढा तालुक्यातील रांझणी, रोपळे कव्हे , म्हैसगाव कुर्डवाडी या ४ मंडलात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बर्‍याच भागात शेतात पुराचे पाण्याबरोबर जमीन वाहून जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे. शेती पिकात सर्वत्र पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान खुप जास्त झाले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.


फोटो– माढा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करताना आमदार अभिजीत पाटील.


शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणे आवश्यक आहे. म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सोबत घेऊन पूरबाधीत भागात जाऊन कर्तव्य बजावले. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशू धनाची हानी, संसारोपयोगी साहित्य आदींचे वस्तूंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने माढा तहसीलदार संजय भोसले यांचे कडे पत्र देऊन सरसकट पंचनामे करण्याचे पत्र दिले आहे..

    "मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून माढा, पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करून मायबाप सरकारकडून मदत तातडीने मिळावी यासाठी पत्र दिले आहे" – आमदार अभिजीत पाटील, माढा विधानसभा. 

Post a Comment

0 Comments