Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्याकडे लक्ष द्यावे – पोलिस उपनिरीक्षक मोनिका खडके

पंढरपूर(दि.14) बालाजी फुगारे.

      शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे आपल्या कर्तुत्वाने आई-वडिलांचे मान उंचावली पाहिजे असे मत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके यांनी व्यक्त केले.त्या महाविद्यालयाच्या वतीने बॅरिस्टर पी.जी.पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अँटी रॅगिंग सप्ताहाच्या विशेष व्याख्याना प्रसंगी बोलत होत्या.पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे अँटी रॅगिंग सप्ताह सुरू असून या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी महाविद्यालय मध्ये विशेष व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.बळवंत,पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मोनिका खटके,कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय पंढरपूर येथील प्रभारी प्राचार्या प्रा.एस.एल.सोनकांबळे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग विषयीचे कायदे,कलमे या विषयी मार्गदर्शन केले.


फोटो – कर्मवीर महाविद्यालय पंढरपूर येथे अँटी रॅगिंग सप्ताहाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मोनिका खडके.




   पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी अँटी रॅगिंग सप्ताहाची सुरुवात झाली.या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी महाविद्यालयामध्ये विशेष व्याख्यानेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक मोनिका खडके व कर्मवीर औदुंबरराव पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.एस. एल सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग विषयीचे कायदे, रॅगिंग गुन्ह्यानंतर झालेल्या तक्रारीनंतर होणारी शिक्षा, त्याचा शिक्षणावरती व कुटुंबावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस बळवंत, उपप्राचार्य बी.एस नाईकनवरे, डॉ.आर जे.कवडे,प्रा.आर.एम.शेख,प्रा.डॉ.एन.डी.देसाई,प्रा.एस.एस.केदार, प्रा.व्हि.बी गारोळे, प्रा.आर.डी गोडसे यासह महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो – कर्मवीर महाविद्यालय पंढरपूर येथे अँटी रॅगिंग सप्ताहाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  कर्मवीर औदुंबर राव पाटील विधी महाविद्यालयच्या प्राचार्या एस.एल.सोनकांबळे.


फोटो ओळ –विशेष व्याख्यान प्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे विद्यार्थी.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँटी रॅगिंग विरोधी समितीच्या चेअरमन प्रा.डॉ.विनया पाटील यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख शिस्त समितीचे प्रमुख प्रा.डॉ.धनाजी साठे यांनी करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी.के.सुडके यांनी केले तर आभार प्रा.डॉ.एन.डी.देसाई यांनी मानले.


Post a Comment

0 Comments