Type Here to Get Search Results !

के.बी.पी.महाविद्यालयाच्या वतीने प्रा.डॉ.धनंजय साठे यांचा सत्कार.


 पंढरपूर(दि.12) बालाजी फुगारे 

   पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा.डॉ.धनंजय साठे यांना मानवतावादी सांस्कृतिक चळवळ कोल्हापूर यांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय पुरस्कार" नुकताच कोल्हापूर येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळाल्याबद्दल महाविद्यालय व इंग्रजी विभाग यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.बळवंत व इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख डॉ.समाधान माने यांनी मंगळवार दि.12 रोजी प्रा.डॉ.धनाजी साठे यांचा सत्कार केला.


फोटो – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.धनंजय साठे यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.बळवंत व इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. समाधान माने.

   यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.एस.नाईकनवरे, प्रा.धनंजय वाघदरे, प्रा.डॉ.महादेव कोरी, प्रा.कुबेर गायकवाड, प्रा.डॉ.सुहास शिंदे, प्रा.डॉ.सोमनाथ व्यवहारे, प्रा.डॉ.प्रवीण शिंदे पाटील, प्रा.विकास गायकवाड, प्रा.सैफअली विजापूरे उपस्थित होते.



कोण आहेत प्रा.डॉ.धनंजय साठे?

     प्रा. डॉ.धनंजय साठे हे गेली २० वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभागी असून सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी इंग्रजी विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत.


(फोटो – कोल्हापूर येथे पुरस्कार स्वीकारताना प्रा.डॉ.धनंजय साठे.)

म्हणून अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

      प्रा.साठे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून,त्यांनी अण्णाभाऊ साठे आणि मॅक्झिम गॉर्की यांच्या कादंबरी मधील वंचित समाज या विषयावरती इंग्रजीमध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून त्यांनी सन २०१९ मध्ये रशिया येथील मॉस्को या ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केला आहे. तसेच त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावरती युजीसी,नवी दिल्ली यांचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला असून गेल्या वर्षी त्यांनी नेपाळ काठमांडू येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासभेटीच्या दौऱ्यामध्ये सहभाग घेतला होता. सध्या ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या सदस्यपदी कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयावरती प्रबोधनात्मक व्याख्याने दिली आहेत.तसेच विविध घटकातील अनेक विद्यार्थी घडवले आ-हेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असून सामाजिक प्रश्ना-वरती काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना सदर पुरस्कार जाहीर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता.




     

   

Post a Comment

0 Comments