Type Here to Get Search Results !

उपजिल्हा रुग्णालयात एच. आय. व्ही. संसर्गितांसाठी रेशीमगाठी वधू वर परिचय मेळावा संपन्न.

पंढरपूर(दि.18) – बालाजी फुगारे

      पंढरपूर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र सोलापूर, ए. आर. टी. पंढरपूर, सोलापूर, बार्शी व एन एस ओ पी प्लस समग्र प्रकल्प पंढरपूर , सोलापूर सर्व आय.सी.टी.सी. केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही. संसर्गित मुला-मुलींकरिता शुक्रवार दि.15 ऑगस्ट रोजी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रेशीमगाठी वधु–वर परिचय मेळावा संपन्न झाला.या परिचय मेळावा करिता महाराष्ट्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळे इच्छुक उमेदवारांची 177 वधू-वरांची नोंदणी झाली. या मेळाव्यास इच्छुक वधू-वरांबरोबर त्यांचे नातेवाईक सह 450 ते 500 नागरिक उपस्थित होते.


(फोटो ओळ – पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एचआयव्ही संसर्गित वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करताना मान्यवर.)

     या वधू – वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धोत्रे यांनी केले.डॉ.सयाजी गायकवाड वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी,तर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन डॉ. प्रदीप केचे, डॉ. प्रसन्न भातलवंडे डॉ. बालाजी बिराजदार डॉ. संभाजी भोसले डॉ.अविनाश वुईके डॉ. विनिता कार्यकर्ते डॉ. खूपसुंगिकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री कृष्णा सकट, कार्यक्रम व्यवस्थापक श्री. समाधान माळी समग्र प्रकल्प पंढरपूर यांच्या शुभहस्ते झाले.



       या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले.यावेळी त्यांनी ए.आर.टी सेंटरचे कामकाज व औषध उपचाराबाबत माहिती दिली. या मेळाव्याचे आयोजन महत्व व गोपनीयतेची काळजी घेऊन इच्छुक वधू-वरांचा सविस्तर परिचय व परस्परांचे विचार विनिमय करिता पुरेसा वेळ व जागा उपलब्ध करून देऊन जवळपास यापैकी नऊ ते दहा विवाह जुळून येण्याची खात्री वाटते. तसेच कुटुंबीयांशी विचार विनिमय करून नजीकच्या काळात सहा ते सात विवाह जुळून येऊन एकूण अंदाज 15 अल्प कालावधीत पूर्णत्वास जातील. सदरील विवाह सामुदायिक विवाह सोहळ्याकरिता प्रोत्सानासाठी प्रयत्न चालू आहेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व परिचय मेळाव्यास शुभेच्छा दिल्या .

    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉ. दीपक धोत्रे यांनी जोडीदारांची निवड व महत्त्व सांगत असताना नेहमी औषध उपचाराचे महत्व सांगितले. एचआयव्ही संसर्गित रुग्णांना सर्वतोपरी औषध उपचार व मोफत रुग्णसेवा तसेच विविध शासकीय योजना देणे बाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली .

       या वधू वर मेळाव्याकरिता 450 ते 500 सहभागी सर्व उमेदवार व नागरिकांसह नाष्टा व भोजनाची व्यवस्था पंढरपूर येथील सामाजिक संस्था, पालवी प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.श्रीम.मंगलताई शहा यांच्यामार्फत मोफत देण्यात आले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक श्री पुरुषोत्तम कदम व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वुईके यांनी केले. तसेच या कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री.संतोष शेंडगे , बाजीराव नामदेव,नागेश देवकर,दीपक गोरे, किशोर जाधव, युवराज वांगी, संदीप देशमुख, सुभाष बळवंतराव, गुलजार शेख, एजाज बागवान, भगवंत भोसले, श्रीम. मीनाक्षी कदम, स्वाती कसबे, सुनाबी शेख, रूपाली देवकर, सुज्ञता गायकवाड, राजश्री टकले, मेघा चंदनशिवे, बाळासाहेब पांढरे, धनंजय कुंभार, सुनील चांदणे, तुकाराम साठे, भारत सोनवले, विशाल शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

........................................

.........

Post a Comment

0 Comments