चळे(दि.18) बालाजी फुगारे
मागील काही दिवसापासून सातत्याने पडत असल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाले आहे तसेच घाणीचेही साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये डासांचे प्रमाण वाढले असल्याने डासांचा प्रतिबंध करण्यासाठी धूर फवारणी करण्याची मागणी चळे ग्रामस्थांमधून होत आहे.
डास चावल्यामुळे मलेरिया,डेंग्यू ,चिकनगुनिया ,झिका व्हायरस ,फायलेरिया या सारखे आजार होतात याशिवाय डास चावल्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, सूज अशी त्रासदायक लक्षणेही दिसतात.
सध्या गावांमध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने विशेषतः सायंकाळच्या सुमारास नागरिकांना या डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होतो.ग्रामपंचायतच्या माध्यमातून फॉगिंग मशीन द्वारे धूर फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गावच्या मध्यवर्ती ठिकाणी अनेक वर्षांपासून गाव तलाव असून त्यामध्ये पाणी साठत असून त्या तलावाची दुरुस्ती करण्याची ही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
" गावात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.ग्रामपंचायतने धूर फवारणी करावी." – अभिजित वाघ,ग्रामस्थ चळे.
"ग्रामपंचायत माध्यमातून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धूर फवारणी करून घेणार आहोत."
–रमेश कोळी,ग्रामविकास अधिकारी,चळे ग्रामपंचायत.

Post a Comment
0 Comments