पंढरपूर(दि.3) बालाजी फुगारे.
माऊली क्लासेस पंढरपूर च्या विद्यार्थ्यांनी विधायक सामाजिक उपक्रम राबवला असून या उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा व वृक्ष लागवडीचा संदेश देणारी तब्बल बाराशे पत्रे पोस्टाने राज्याभर पाठवली असून यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका,नगरपालिका, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 600 शाळा आणि काही राजकीय पदाधिकारी यांना सुंदर हस्ताक्षरात पत्र लिहून पोस्टाने पाठवली आहेत.
फोटो – माऊली क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यांनी लिहिलेले पत्र. व त्यावर ती काढलेले झाडाचे सुंदर चित्र.
माऊली क्लासेसचे संचालक आनंद नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड संदर्भात विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नगरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला असून प्रत्येकी 40 पत्रे विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत.या उपक्रमात पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.पंढरपूर पोस्ट ऑफिसचे हेड पोस्ट मास्टर सोमनाथ गायकवाड यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
राज्यभर बाराशे पत्र लिहीत असताना माऊली क्लासचे विद्यार्थी.
या पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे,
"आज भारत स्वतंत्र आणि सुरक्षितही आहे, तो क्रांतिकारक आणि सैनिकांमुळे. आता आपणास तो फक्त स्क्छ आणि हरित ठेवायचा आहे. त्यासाठी-
- कचरा घंटा गाडीतच टाका.
- रस्त्यावर कुठेही थुंकू नका.
- प्लास्टिकचा वापर टाळा.
- नदी, विहिरी, तलाव इ. जलसाठे स्वच्छ ठेवा.
- एक तरी झाड लावा व जगवा.
- हे आपणही करा व इतरांनाही सांगा."
या संदेशाची व त्यावर झाडाचे चित्र असलेली आकर्षक १२०० पत्र पाठवली आहेत.ही पत्रे आषाढी वारी कालावधीत पाठवली गेल्याने व आपल्याला पंढरपूर वरून पत्र आले आहे याची जाण ठेवून या पत्रातील संदेशाचे निश्चित पालन केले जाईल. असा आशावाद माऊली क्लासेसचे संचालक आनंद नगरकर यांनी व्यक्त केला.
हेड पोस्ट चे सोमनाथ गायकवाड यांच्याकडे पत्र सुपूर्द करताना माऊली क्लासेसचे संचालक आनंद नगरकर.



Post a Comment
0 Comments