Type Here to Get Search Results !

पुनरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजनेस 6 जुलै पर्यंत मुदत वाढ

सोलापूर(दि.3) प्रतिनिधी.

  

        प्रधानमंत्री पिक पिमा योजने अंतर्गत पुनरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजना अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार कडून फळ पिक विमा भरण्यास मुदत वाढ देण्यात येत आहे. मार्गदर्शक सूचना नुसार पेरू, मोसंबी व लिंबू पिकाचा फळपिक विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 पर्यंत होती. परंतु ऑनलाईन पोर्टल वरील काही तांत्रिक अडचणीमुळे सोलापूर जिल्ह्यातून बरेच शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. सदर सर्व पेरू, मोसंबी व लिंबू फळबाग धारक शेतकर्याना कळविण्यात येते कि पेरू मोसंबी व लिंबू पिकाचा फळपिक विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली होती त्यास पुन्हा मुदत वाढ होऊन दिनांक 06 जुलै 2025 वाढविण्यात आलेली आहे.


पिक – पेरू- पिकाचे उत्पादनक्षम वय (वर्ष) 3- विमा भरणा मुदत-14 जून 2025 - सुधारित विमा भरणा मुदत-06 जुलै 2025- शेतकरी विमा हफ्ता (प्रति हेक्टरी)-3500 - विमा सरक्षित रक्कम -70000

मोसंबी- पिकाचे उत्पादनक्षम वय (वर्ष) 3- विमा भरणा मुदत-14 जून 2025 - सुधारित विमा भरणा मुदत-06 जुलै 2025- शेतकरी विमा हफ्ता (प्रति हेक्टरी)-5000 - विमा सरक्षित रक्कम – 100000

लिंबू- पिकाचे उत्पादनक्षम वय (वर्ष) 4 - विमा भरणा मुदत-14 जून 2025 - सुधारित विमा भरणा मुदत-06 जुलै 2025- शेतकरी विमा हफ्ता (प्रति हेक्टरी)-4000 - विमा सरक्षित रक्कम – 80000

तरी सोलापूर सोलापूर जिल्हातील सर्व डाळिंब, पेरू, लिंबू, चिकू, सीताफळ व मोसंबी बाग धारक शेतकऱ्यांनी आपल्या फळ बागेचा विमा नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर, बैंक किवा आपले सरकार केंद्रास भेट देवून आपली फळबाग विमा संरक्षित करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे

                                              

Post a Comment

0 Comments