चळे(दि.22) बालाजी फुगारे.
चळे तालुका पंढरपूर येथील श्री स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चळे या नूतन पतसंस्थेच्या चेअरमनपदी वंदना रामचंद्र शिंदे तर व्हॉईस चेअरमनपदी रेश्मा अमोल मोरे यांची निवड झाली आहे. 6 मे रोजी सहाय्यक निबंधक वाय.एस.मुरडे यांनी नोंदणीचे प्रमाणपत्र दिले होते.बुधवार दि.21 रोजी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये पंढरपूर निबंधक कार्यालयातील वैभव चव्हाण,सचिन जाधव,विलास घोडके यांच्या उपस्थितीत मध्ये या सर्व निवडी पार पडल्या.
श्री स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी पुजा सचिन शिंदे,दिक्षा चिंतामणी शिखरे,गिता संतोष देशमाने,चंद्रभागा तुकाराम वाघमोडे,सिंधु अनिल गायकवाड,राणी अतुल मोरे,उज्वला अनिल मोरे,बायडाबाई सखाराम शिंदे,स्वाती नितीन खिलारे यांची निवड झाली आहे.
यावेळी डॉ. प्रमोद शिंदे,विक्रम आसबे,पांडुरंग खिलारी, चळे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अनिल गायकवाड,रामचंद्र शिंदे,दत्तात्रय शिंदे,प्रा.राजेंद्र शिंदे,चिंतामणी शिखरे,अतुल मोरे, सखाराम शिंदे,गोट्या शिखरे,नितीन खिलारी प्रकाश खिल्लारे,सचिन शिंदे,लक्ष्मण मोरे – पाटील ,रमेश वाघ यांच्यासह वैभव चव्हाण सचिन जाधव विलास घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments