Type Here to Get Search Results !

रवी मेकला चळे शाखेचे नवे शाखाधिकारी


 चळे (दि.19) बालाजी फुगारे
    पंढरपूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळेच्या शाखाधिकारी पदी रवी मेकला यांची शनिवार(दि.17) रोजी नियुक्ती झाली आहे.पूर्वीचे शाखाधिकारी सचिनकुमार रजपूत यांनी मागील दोन वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांची मंगळवेढा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
    पूर्वाश्रमीचे शाखाधिकारी सचिनकुमार रजपूत यांनी मागील दोन वर्षात ग्राहकांना सर्वोत्तम सेवा दिली. तसेच  बँकेच्या कर्जवसुली साठीही त्यांनी चांगले प्रयत्न केले.रजपूत यांनी मागील दोन वर्षात एक चांगला बँक अधिकारी अशी ओळख निर्माण केली होती.
      सचिन रजपूत यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा व नूतन शाखाधिकारी रवी मेघला यांचा स्वागत समारंभ चळे ब्रँच येथील स्टॉफच्या करण्यात आला.यावेळी प्रशांत मोगली, कॅशियर हरिदास सावंत, पांडुरंग शिंदे, नागनाथ शिखरे, बालाजी पोरे,समाधान शिंदे,बापू कोकरे उपस्थित होते.

शाखाधिकारी सचिनकुमार रजपूत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या देताना व नूतन शाखाधिकारी रवी मेकला यांचे स्वागत करताना समाधान शिंदे,बालाजी पोरे,नागनाथ शिखरे,बापू कोकरे.

Post a Comment

0 Comments