Type Here to Get Search Results !

स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर.


पंढरपूर (दि.28)-  बालाजी फुगारे 



पंढरपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, कथाकथनकार, वृत्तपत्र लेखक,आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते स्व.आप्पासाहेब चव्हाण यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त श्री.आप्पासाहेब चव्हाण स्मृति पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराचे वितरण व महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ ट्राॅन्सफाॅरमेशन (मित्र) संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांचा सत्कार रविवार दि.४ मे २०२५ रोजी सायं.५.३० वा.गणेशनाथ मंगल कार्यालय केबीपी काॅलेज चौक पंढरपूर येथे होणार आहे. मा आ.श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्री.वामनराव माने यांच्या अध्यक्षतेखाली,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.हरीषदादा गायकवाड,जि.प.सदस्य श्री.सुभाषराव माने श्री. पंडितराव देशमुख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये श्रीमती रेणुका बूधाराम साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल, शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी श्री.पांडूरंग शिंदे कै.शं.बा.पाटील विद्यालय अनगर ,ता.मोहोळ यांना तसेच सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी श्री.ज्ञानेश्वर दुधाणे करकंब ता. पंढरपूर यांना स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण स्मृति पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे.चि. द्वारकाधीश विनायक सातारकर (आदर्श प्राथमिक विद्यालय) 

कु.ओवी निखिल कौलवार (आदर्श बाल प्राथमिक विद्यालय) 

कु.कार्तिकी किशोर हावळे(बाल विकास प्राथमिक व पुर्व प्राथमिक प्रशाला बोहाळी) चि. राज तानाजी नाईकनवरे 

(शांताप्रभू प्रशाला अजनसोंड) कु.सलोनी आनंदा कांबळे (सिद्धेश्वर प्रशाला तपकिरी शेटफळ) 

चि. आदित्य संभाजी भोसले (जि.प प्राथ.शाळा नारायण चिंचोली) 

चि.वेदांत वीरभद्र स्वामी (माताजी निर्मलादेवी विद्यामंदिर) कु. स्नेहा लहू शिंदे (कर्मयोगी विद्यानिकेतन) 

या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात येणार आहे,तरी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अमरसिंह चव्हाण,अमोल चव्हाण व प्रतापसिंह चव्हाण व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments