चळे(दि.23) बालाजी फुगारे
चळे येथील शेतकरी बाळासो दगडू खिलारे(वय 55) यांचे आज बुधवारी(दि.23)रोजी सकाळी अकस्मित निधन झाले.सकाळी शेतात पाणी देण्यासाठी ते गेले होते.बराच वेळ झाल्यानंतर ते घराकडे आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते ठिकाणी ते बेशुद्ध अस्वथेत आढळले. प्राथमिक उपचार साठी त्यांना स्थानिक दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना सर्पदंश झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.चळे येथील स्मशानभूमी मध्ये दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,दोन मुले,असा परिवार आहे.
ते चळे ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य होत. बाळासो यांचा स्वभाव अतिशय शांत होता.सर्वांना मदत करण्यास ते नेहमी अग्रही असायचे. त्यांच्या अकस्मित निधनाने संपूर्ण गावातील शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments