Type Here to Get Search Results !

ज्ञानेश्वर कांबळे यांच्या निवडीबद्दल राजमाता पतसंस्थेतर्फे सत्कार

चळे(दि.20) बालाजी फुगारे

    चळे तालुका पंढरपूर येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदा कांबळे यांची नुकतीच  श्री सदगुरू सिताराम अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. मंगळवेढ्याच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल पंढरपूर तालुका कार्यक्षेत्र असणारी चळे येथील राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामदास घाडगे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी चळे ग्रामपंचायतचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रताप गायकवाड,आम आदमी पार्टी पंढरपूर तालुकाध्यक्ष बंडू मोरे,आप्पासो कांबळे उपस्थित होते.


फोटो ओळ – व्हायचं म्हणून पद निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर कांबळे यांचा सन्मान करताना डॉ.रामदास घाडगे,प्रताप गायकवाड,बंडू मोरे,आप्पासो कांबळे.

Post a Comment

0 Comments