Type Here to Get Search Results !

भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना - प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर (दि.05)- बालाजी फुगारे.

      माघ यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी चार आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून, हे कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.


              माघ वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, नगरपालिका, पत्राशेड, , विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, तसेच मुख्य आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. भाविकांना काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments