पंढरपूर- (दि.11) बालाजी फुगारे.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू असणाऱ्या प्रभाकर परिचारक यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात खंबीरपणे पाठीमागे राहून मोठी जबाबदारी पार पडली होती. पंढरपूर येथील न्यायालयात काही वर्ष त्यांनी वकील म्हणूनही काम केले होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंढरपूर शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली .त्यांचे पार्थिवावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सांय ठीक 6.30 वाजता अंत्यसंस्कार होतील असे परिचारक यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments