Type Here to Get Search Results !

DVP चळे शाखेत पत्रकारांचा सन्मा

चळे(दि. 6) बालाजी फुगारे.

      6 जानेवारी हा दिवस राज्य मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सन 1832 मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले. दर्पण'च्या पहिल्या अंकात इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये माहिती दिली जात असे. यामुळे इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी व भावना समजून घेता आल्या.मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू करून त्या माध्यमातून एतद्देशिय समाजाला प्रबोधित करण्याच्या केलेल्या कार्यामुळे त्यांना दर्पणकार म्हणून संबोधले जाते."

   या पत्रकार दिनाचे औचित्य साधत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शक खाली सुरु असलेली दि पीपल मल्टीस्टेट(DVP)शाखा चळे यांच्या वतीने चळे येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

      यावेळी पंढरपूर माझा चे संपादक संतोष मोरे, लोकप्रवाहाचे संपादक अतुल मोरे, परिवर्तन न्यूज चे संपादक बालाजी फुगारे, AB मराठी न्यूज चे प्रतिनिधी सुर्यकांत माने यांचा सन्मान शाखाधिकारी सौरभ मोरे, कॅशियर तुषार वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अतुल मोरे यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आभार मानले.




Post a Comment

0 Comments