Type Here to Get Search Results !

वसंत हंकारे यांचे चळे येथे व्याख्यान

चळे(दि. 7) बालाजी फुगारे.

 चळे तालुका पंढरपूर येथील सुरज मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री दर्लिंग विद्या मंदिर चळे येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे न समजलेले आई बाबा या विषयावर गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 9वाजता व्याख्यान संपन्न होणार आहे.

  वसंत हंकारे यांनी महाराष्ट्राभर व्याख्यान देत तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवले आहे.

   पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री हरीश दादा गायकवाड यांच्या विशेष सहकार्याने व सुरज मोरे मित्रपरिवार यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

   तरी या व्याख्यानासाठी चळे व पंचक्रोशीतील नागरिकांनी, तरुणाईने उपस्थित राहावे असे आवाहन सूरज मोरे मित्र परिवाराच्या करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments