Type Here to Get Search Results !

गावठाण हद्दीत राहणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना राहत्या जागेवर घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी - रामदास चवरे

मोहोळ -(दि.31) प्रतिनिधी 

     मोहोळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे परंतु सदर लाभार्थ्यांकडे मालकी हक्काची जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे बऱ्याच गरजू लाभार्थ्यांची घरकुले रद्द होत आहेत 

     त्यामुळे ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना गावठाण हद्दीतील राहत्या जागेवर घरकुल बांधण्यास परवानगी मिळावी व ज्यांच्याकडे जागा नाही अशा लाभार्थ्यांना गावठाण हद्दीतील जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन पेनूरचे ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले.


फोटो ओळ - घरकुल बांधणीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देताना पेनुर ग्रामपंचायत चे सदस्य रामदास चवरे.

 " मोहोळ तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिक खूप वर्षांपासून गावठाण हद्दीत पत्रा शेड, झोपडी बांधून राहत आहेत,त्यांना पक्के घर नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे शासनाकडून त्यांना प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले परंतु स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल बांधता येत नाही अशा लोकांना गावठाण हद्दीत राहत्या जागेवर घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी तसेच ज्यांना जागा नाही त्यांना सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी व त्याठिकाणी त्यांना घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी त्यामुळे गोर गरीब लोकांना त्यांचे हक्काचे पक्के घर मिळणार आहे."-रामदास चवरे, पेनुर ग्रामपंचायत सदस्य

Post a Comment

0 Comments