पंढरपूर (दि.30)- बालाजी फुगारे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुध्द1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून, मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक 02 फेब्रुवारी रोजी आहे. त्या निमित्ताने श्री विठ्ठल सभामंडप येथे दुपारी 04.00 ते सायं 06.00 या वेळेत श्री रूक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद् भागवताचार्य कु. साध्वी अनुराधा (दिदी) राजेंद्र शेटे यांचे सुमधूर व रसाळ वाणीने करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
फोटो ओळ - श्रीमद् भागवताचार्य कु. साध्वी अनुराधा (दिदी).
श्री रूक्मिणी स्वयंवर कथा दि. 30 जानेवारी ते 01 फेब्रुवारी या दरम्यान दुपारी 4.00 ते 6.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीने केली असून, परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी स.10.00 ते 12.00 या वेळेत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्या दिवशी येणा-या भाविकांना अन्नछत्रात विशेष भोजनाची व्यवस्था,
मंदिर समितीचे संकेतस्थळ, फेसबुक, युट्यबवरून थेट प्रेक्षपण, मंदिर परिसरात एलईडी स्क्रिन, स्वच्छता , मंडप, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, सुरक्षारक्षक नियुक्ती तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर दुपारी प्रदक्षिणा मार्गावर शोभा यात्रा काढण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments