चळे(दि.13) बालाजी फुगारे.
चळे येथील श्रीराम मंदिराच्या समोर असणाऱ्या अंगणवाडीच्या सभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे अंगणवाडीचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
या अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटाची 28 मुले शिकत असून नियमित शाळेमध्ये उपस्थित राहतात. या लहान मुलांसमवेत काही माता पालक ही मुलांना शाळेत घेऊन येत आहेत.
मात्र अंगणवाडीच्या सभोवताली धुळीचे व घाणीचे साम्राज्य पसरल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंगणवाडीचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
अंगणवाडीच्या भिंतीचा लघुसंखेसाठी वापर
या अंगणवाडी परिसरामध्ये ग्रामपंचायत च्या वतीने दोन मुतारी उभा करण्यात आल्या आहेत मात्र अंगणवाडीच्या उजव्या बाजूच्या भिंतीचा लघुसंखेसाठी वापर केला जात आहे.
"अंगणवाडी सेविका यांच्याकडून माहिती घेतली आहे.ग्रामपंचायत यांना कळविले आहे. दोन दिवसांमध्ये परिसर स्वच्छ केला जाईल - सुर्यवंशी मॅडम, पर्यवेक्षिका.


Post a Comment
0 Comments