चळे(दि.12)बालाजी फुगारे.
52 वे तालुकास्तरीय विज्ञान अधिवेश अनवली येथे दि.12 रोजी संपन्न झाले.या संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये चळे ता.पंढरपूर येथील श्री दर्लिंग विद्या मंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय, येथील इयत्ता ८ वी तील विद्यार्थी श्रेयश दत्तात्रय शिखरे याने तयार केलेल्या वैज्ञानिक उपकरणाचा तिसरा क्रमांक आला आहे. हे उपकरण पुढे जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी निवडले आहे, या विद्यार्थ्याला विज्ञान शिक्षक श्री लक्ष्मीप्रसाद मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष हरीश दादा गायकवाड, प्राचार्य जे.बी. गायकवाड ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी यांनी श्रेयशचे अभिनंदन केले ,तसेच या प्रदर्शनामध्ये सहभागाबद्दल प्रतिक मोहन वाघ याचेही अभिनंदन करून प्रशालेतर्फे सन्मान करण्यात आला.

Post a Comment
0 Comments