मंगळवेढा(दि.12)- प्रतिनिधी.
आमदार शपथ विधीचा कार्यक्रम संपल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे मतदारसंघांमध्ये सक्रिय झाले असून,आ. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची पहिली आढावा बैठक घेतली आहे.अधिकाऱ्यांनी गतिमान प्रशासन चालवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ द्या या कामात हलगर्जीपणा दिसून आला तर मी कुणाचीही गय करणार नाही.असा इशारा आ. आवताडे यांनी दिला आहे.दर महिन्याला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल, कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा सूचना आ. अवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशासनातील सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी आमदार आवताडे बोलत होते.या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, प्रांतअधिकारी बी.आर.माळी, तहसीलदार मदन जाधव,गटविकास अधिकारी योगेश कदम,जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,माजी सभापती तानाजी काकडे,माजी उपसभापती सुरेश ढोणे,रामेश्वर मासाळ, माऊली कोंडुभैरी,प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्येक विभागाच्या खाते प्रमुखांकडून त्या त्या विभागातील कामाचा आढावा घेत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
कृषी विभागाचा आढावा घेत,पीक विम्यामध्ये बोगसगिरी होत असून बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने येणाऱ्या काळात टंचाई जाणवण्याची शक्यता असून त्यांचा आराखडे तात्काळ तयार करून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.त्याचबरोबर काही ठिकाणी जलजीवनच्या कामांमध्ये निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत अशा कामांना मी स्वतः भेटी देणार असल्याचेही आमदार अवताडे यांनी सांगितले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प,पशुसंवर्धन विभागा, शिक्षण व आरोग्य,महसूल, ग्रामविकास,
नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल हे कोटीच्या घरात गेले असून शिखर समितीला ही योजना चालवणे शक्य नसून शिखर समिती रद्द करून ही योजना शासनाकडे हस्तांतर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महावितरण विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून मी मंजूर करून आणलेले ट्रांसफार्मर हे ठेकेदार आम्ही मंजूर करून आणतो असे सांगून शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडत आहेत यावर संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अन्यथा मला माझ्या पद्धतीने तुमच्यावर लक्ष द्यावे लागेल असा इसारा महावितरण विभागाला देत जर कोणत्या शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम महावितरण अधिकाऱ्यांना दिला याचबरोबर म्हैसाळ योजना भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक आगार व्यवस्थापन क्रीडा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क अन्न औषध प्रशासन भूजल सर्वेक्षण वनविभाग महसूल विभाग आदी विभागांचा आढावा घेत कामात गतिमानता आणा मी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक लावून दर महिन्याला कामात किती सुधारणा झाली हे पाहणार आहे व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असा इशारा आ आवताडे यांनी बैठकीप्रसंगी दिला.
फोटो-

Post a Comment
0 Comments