Type Here to Get Search Results !

आ.यशवंत माने यांनी घेतली परिचारक, काळे यांची भेट

पंढरपूर(दि.1) - बालाजी फुगारे.

   मोहोळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांनी आज विधानपरिषदेचे माजी आमदार,पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांची भेट घेतली यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड,उपसभापती राजूबापुव गावडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती पंडित भोसले उपस्थित होते.



     तसेच आ.माने यांनी विठ्ठल परिवाराचे नेते सहकार शिरोमनीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांचीही भेट घेतली आहे.



     आ.यशवंत माने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संपूर्ण मतदार संघाचा दौरा पूर्ण करत  प्रचारात आघाडी घेतली आहे.मोहोळ मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील 17 गावामध्ये परिचारक,भालके,काळे तसेच पाटील गट सक्रिय असून त्यांची या भागात मोठी ताकत आहे.आ.माने यांनी आज पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग आणि विठ्ठल परिवारातील नेत्यांची भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.प्रशांत परिचारक हे भाजपचे नेते तर कल्याणराव काळे हे अजित पवार गटाचे नेते आहेत. हे नेते महायुतीचे असल्याने आमदार माने यांची ही भेट विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Post a Comment

0 Comments