चळे(दि.27)- बालाजी फुगारे.
संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशा नुसार पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा 252 मतदारसंघातून चळे तालुका पंढरपूर येथील युवराज दिनकरराव गायकवाड हे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून सोमवार(दि.28) रोजी दाखल करणार आहेत.त्यासाठी सकल मराठा समाज व चळे ग्रामस्थ व माता भगिनी युवक कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरागे पाटील यांच्या आदेशानुसार सातत्याने युवराज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच चळे ते अंतरवाली सराटी बैलगाडी मोर्चा युवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता तेव्हा या बैलगाडी मोर्चाला पंढरपूर तालुका व जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
बैलगाडी मोर्चा नंतर साखळी उपोषण ही प्रत्येक गावोगावी करण्यात आले होते त्या साखळी उपोषण मध्ये ही युवराज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा अनेक दिवस लढा सुरू होता. मराठा आंदोलनासाठी सातत्याने सक्रिय भूमिका घेणारी युवराज गायकवाड हे उद्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा 2024 साठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Post a Comment
0 Comments