पंढरपूर (दि.26) बालाजी फुगारे.
मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने हे उद्या रविवार दिनांक 27 रोजी पंढरपूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 9वा.कोंढारकी,10 वा.चळे,11.30 वाजता आंबे,12 वाजता सरकोली,4 वाजता ओझेवाडी,5 वाजता नेपतगाव व सायंकाळी 6 वा.आंबेचिंचोली या गावांमध्ये आमदार माने यांचा गाव भेट दौरा नियोजित आहे.
विधानसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार माने यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.आमदार यशवंत माने हे महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार असून त्यांनी नुकताच उमेदवारी अर्जही भरला आहे.
आमदार यशवंत माने यांनी मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघांमध्ये तब्बल 2700 कोटी रुपयांचा निधी आणत अनेक विकास कामे केली आहेत. आ.यशवंत माने यांच्या निधीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील 17 गावांमध्ये अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते आणि पाणीपुरवठा योजना या महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

Post a Comment
0 Comments