सोलापूर - प्रतिनिधि - (दि.12)
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असून या योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यात येऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना जिल्हा अंमलबजावणी समितीची सभेत अध्यक्ष स्थानावरून जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी राम वाखरडे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास हणमंत नलावडे, जिल्हा सह आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती वीणा पवार, जिल्हा समन्वयक एनयुएलएम शहर अभियान व्यवस्थापक सोलापूर महानगरपालिका श्रीमती उज्वला गणेश, गट विकास अधिकारी मोहोळ आनंदकुमार मिरगणे, गट विकास अधिकारी मंगळवेढा/ सांगोला योगेश कदम, गट विकास अधिकारी दक्षिण सोलापूर बी.डी.वाघ, सहायक गट विकास अधिकारी अक्कलकोट ए.आर.दोडमनी, राष्ट्रीय सुकाणु समिती सदस्य अर्चना वडनाल, विशाल गायकवाड, सामान्य सेवा केंद्र सोलापूर सोमेश भोसले तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत विशेष लक्ष देऊन पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या पारंपारिक कारागिरांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रसार प्रचार करावा. तसेच जास्तीत जास्त कारागिरांची नोंदणी करून योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.
•पी.एम.विश्वकर्मा योजना
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागिर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भार सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या नावाची नवीन योजना मंजूर केली आहे.
•या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे:-
1.यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थीला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल.
2. कौशल्य पडताळणीनंतर पाच दिवसीय बेसीक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत रू.500/- रोज विद्यावेतन दिले जाणार आहे.
3.प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट खरेदीसाठी रू.15 हजार चे ई-व्हावचर दिले जाईल.
4. मुलभूत कौशल्या प्रशिक्षणानंतर लाभार्थी लाभ घेण्यासाठी पात्र होईल पहिल्या टप्यात 5 टक्के व्याजासह 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 1 लाखापर्यंतचे तारण मुक्त कर्जव दुसऱ्या टप्यात प्रगत कौशल्या प्रशिक्षण घेतेले आहे. डिजिटल व्यवहार स्विकारलेले आहेत. त्यांना 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 2 लाखापर्यंतचे तारण मुक्त कर्ज.
5.डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन, लाभार्थींना जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी मासीक प्रत व्यवहार प्रोत्साहन रू 1 मिळेल.
6. मार्केटिंग सहाय्य: प्रचार-प्रसिध्दी, गुणवत्ता प्रमाणीकरण, बॅन्डींग, प्रदर्शने,
•कोणाला लाभ घेता येणार आहे.
सुतार, लोहार, सोनार, कुंभार, चांभार (चर्मकार) बुट/पादत्राणे कारागिर, न्हावी, परीट/धोबी, शिंपी, शिल्पकार (मुर्तीकार, कोरीव काम, दगड तोडणारा), टोपली/चटई/झाडू बनविणारा, कॉयर विणकाम, बाहुली आणि खेळणी बनविणारा, हातोडा आणि हत्यारे/औजारे साहीत्यांचा संच बनविणारा, कुलूपे बनविणारा, मेस्त्री/गवंडीकाम, पुष्पहार/माळा बनविणार, मासे पकडण्याचे जाळे बनविणारा, बोट बनविणारे, चिलखत (शस्त्रे) बनविणारे पारंपारिक कारागिर.
•कारागीरांची पात्रता निकष- 18 व्यवसायांपैकी कुटुंबातील सदस्याकडून कौशल्या प्राप्त केलेले कुटुंब आधारित पारंपारित कारागीर नोंदणीसाठी पात्र असेल, लाभार्थींचे वय नोंदणीच्या तारखेला 18 वर्षे किंवा अधिक असावे, जर एखाद्याला विश्वकर्मा योजनेचा लाक्ष घ्यावयाचा असेल तर त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल ज्यामध्ये त्याने नोंदणीच्या वेळी व्यवसाय काम करण्याची माहिी दिली होती व काम करीत आहे. आणि तिने मागील 5 वर्षात स्वयंरोजगार/व्यवसाय विकासासाठी तत्सम क्रेडिट आधारित योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. उदा- केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे PMEGP/CMEGP आणि PM SVANidhi तथापि, MUDRA आणि PM SVANidhi चे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र असतील, लाभ प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील आणि कुटुंबातील व्याख्या अशी असेल पती, पत्नी आणि अविवाहित मुले, सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेअंतर्गत पात्र असणार नाहीत.
•नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक व आधार कार्ड संलग्न मोबाईल नंबर इत्यादी
Post a Comment
0 Comments