Type Here to Get Search Results !

सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नागेश बनसोडे.

चळे (दि.10) बालाजी फुगारे.




    चळे तालुका पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबात असलेले पोलीस उपनिरीक्षक नागेश हरी बनसोडे यांची पदोन्नतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक(API)पदी निवड झाली आहे. नागेश बनसोडे यांनी दहा वर्षे मुंबई येथील अंधेरी,मालाड,सहारा विमानतळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक(PSI )पदाची सेवा केली असून आता ते ठाणे शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API)म्हणून सेवा बजावणार आहेत.

      नागेश बनसोडे यांनी मागील दहा वर्षात पोलीस उपनिरीक्षक पदावर करत असताना दैदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागाच्या वतीने त्यांचा veloveli सन्मान हि करण्यात आला होता.

      शेतकरी कुटुंबात असलेले नागेश बनसोडे यांचे एमपीएससी मार्फत घेतलेल्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी मुंबई येथे निवड झाली होती. नोकरीच्या निमित्ताने जर त्यांचे वास्तव्य मुंबई येथे असले तरी त्यांनी गावाकडील नागरिकांशी नाळ कधीही तुटू दिली नाही. गावातील नागरिकांच्या अडीअडचणीच्या वेळेस मदत करत, कोरोना काळामध्येही त्यांनी नागरिकांना वैद्यकीय मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.नागेश बनसोडे यांच्या नियुक्ती बद्दल चळे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments