चळे(दि.30)- बालाजी फुगारे.
चळे उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या चळे येथील गावठाण भागातील पशुवैद्यकीय दवाखाना येथे असणाऱ्या रोहित्रचा पाठीमागील तीन दिवसांपासून बिघाड झाला होता,तेव्हापासून चळे येथील हनुमान मंदिर परिसर,डोंगरे गल्ली,श्रीराम मंदिर परिसर हा भाग अंधारामध्ये होता. महावितरणचे कनिष्ठ अभियंता,कर्मचारी व गावातील तरुण हे सातत्याने पाठीमागील तीन दिवसापासून हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.यासाठी नवीन रोहित्र मागवण्यात आला होता मात्र तोही तांत्रिक अडचणीमुळे नादुरुस्त झाला.
शनिवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून झालेला बिघाड हा मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू झाला.या कालावधीमध्ये महावितरण च्या वतीने दोन रोहित्र बदलण्यात आले.
हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी चळे उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र फाटे,कर्मचारी नागनाथ थोरात,महेश घायाळ,यांच्या सह काशिनाथ सटाले,सीताराम दांडगे,दिगंबर माने,बाळू माने,श्रीकांत पंडित,सचिन गायकवाड,समाधान कोळी,नितीन गायकवाड यांनी परिश्रम घेतले. शनिवारी सकाळी सहा वाजता खंडित झालेला विद्युत पुरवठा मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाल्याने (तब्बल 84 तासानंतर)ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
फोटो - विद्युत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना महावितरणचे कर्मचारी.

Post a Comment
0 Comments