Type Here to Get Search Results !

कलाशिक्षक बंडू मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

पंढरपूर(दि.24) - बालाजी फुगारे.


                      फोटो - कलाशिक्षक बंडू मोरे.

   कवठेकर प्रशाला नाथ चौक,पंढरपूर येथील कलाशिक्षक बंडू भानुदास मोरे यांना तेजस फाउंडेशन,नाशिक यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. बंडू मोरे हे मागील 30 वर्षापासून कवठेकर प्रशाला येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आज पर्यंत केलेल्या शैक्षणिक,सामाजिक कार्याची दखल घेत तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार 2024 जाहीर केला आहे.




     8 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापुर येथील राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह येथे त्यांना हा समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. मोरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


फोटो - बंडू मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कवठेकर प्रशालेच्या वतीने सत्कार करताना प्रशालीतील शिक्षक.

Post a Comment

0 Comments