चळे (दि.23) - बालाजी फुगारे.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या वर्षाराणी रमेश शिंदे यांना अविष्कार फाउंडेशन (कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य)चा राजमाता जिजाऊ पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे.
वर्षाताई या गेल्या 18 वर्षापासून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा वैद्यकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
वर्षाराणी शिंदे यांनी शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने हा पुरस्कार दिला असल्याची माहिती संस्थाध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे. वर्षाताई शिंदे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार हा 10 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथील शिवशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल वर्षा राणी शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Post a Comment
0 Comments