चळे (दि.22) - बालाजी फुगारे.
मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार यशवंत माने यांनी मागील पाच वर्षांमध्ये सरकारकडून कोट्यवधींचा निधी आणत मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 17 गावांसाठी विशेष प्रयत्न केल्याचे चित्र मागील पाच वर्षातील दिलेल्या निधीवरून दिसत आहे.मोहोळ मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील 17 गावे असून या 17 गावातील प्रामुख्याने रस्त्याचे असणारे प्रश्न आमदार माने यांनी भरून निधी देऊन सोडवले आहेत.आतापर्यंत आमदार यशवंत माने यांनी जवळपास दोन हजार कोटींचा निधी मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आणला आहे.
आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून मतदारसंघातील रस्ते, पिण्याची पाणी आणि आरोग्याचे बरेच प्रश्न मार्गी लागल्याचे दिसून येत आहे.पाच वर्षाच्या कालावधीतील शेवटच्या टप्प्यात सुद्धा आ.यशवंत माने यांनी मोहोळ मतदार संघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 67 किलोमीटर रस्त्यांच्या कामासाठी 120 कोटी 89 लाख 80 हजार रुपयांचे निधी मंजूर करत मतदारसंघांवरती आपली पकड कायम ठेवली आहे.
या मंजूर केलेल्या रस्त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव ते नळी रस्ता,चळेपाटी ते चळे रस्ता मोहोळ तालुक्यातील अरबळी ते इचगाव,अंकोली ते पुळूजवाडी रस्ता,पोखरापुर ते राज्य मार्ग ९ रस्ता, गलंदवाडी ते कोंबडवाडी रस्ता,अर्जुनसोड ते मुंढेवाडी रस्ता, बेगमपुर ते अरबळी रस्ता.या गावातील रस्त्यांचा समावेश आहे.

Post a Comment
0 Comments