सोलापूर (दि.21) प्रतिनिधी- बालाजी फुगारे.म
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार मा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,सोलापूर शहर यांच्या वतीने सोलापूर येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन मोहोळ मतदार संघाचे कार्यक्षम आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले.
फोटो - जिल्हास्तरीय बुद्धिमत्ता स्पर्धेचे उद्घाटन करताना मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने, शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर.
यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे व्हा. चेअरमन दिपक माळी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,महिला अध्यक्षा संगिता जोगदनकर,कार्याध्यक्षा चित्रा कदम,ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे,राजेश देशमुख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख,शहर समन्वयक शशिकला कस्पटे,शोभा गायकवाड,प्रिया पवार,कांचन पवार,रुक्मिणी जाधव,संगीता गायकवाड, सरोजिनी जाधव सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments