चळे (दि.20) प्रतिनिधी - बालाजी फुगारे
मोहोळ मतदार संघासाठी पंढरपूर तालुक्यातील चळेपाटी ते चळे रस्त्यासाठी आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून तब्बल नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..
मोहोळ मतदारसंघातील चळेपाटी ते चळे या पाच किलोमीटर रस्त्यासाठी आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून 8 कोटी 86 लाख 51 हजार रुपयांचा निधी मंजूर तसेच देखभाल दुरुस्तीसाठी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यातला आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चळेपाटी ते चळे या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता मात्र आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला भरून निधी मिळाल्याने या पाच किलोमीटर रस्त्याचा वनवास अखेर संपणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल जय ग्रामस्थांमधून आमदार यशवंत माने यांचे आभार मानले जात आहेत.

Post a Comment
0 Comments