चळे (दि.8) प्रतिनिधी - बालाजी फुगारे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना मासिक दीड हजार रुपये शासनाच्या वतीने मदत केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.त्यासाठीचे शिबिर चळे येथे विठ्ठलचे कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील यांच्या माध्यमातून हे शिबिर मोफत घेण्यात येत आहे. हे शिबिर चलेतील महादेव मंदिर शेजारी असणाऱ्या सांस्कृतिक कार्यालया या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील चळे या गावाबरोबरच शिरढोण, कौठाळी, खेड भाळवणी,कासेगाव व आंबे या ठिकाणीही अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात येणार आहे. तरी या शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन योजनेत लाभ असणाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिजीत पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments