Type Here to Get Search Results !

पाच विधानसभा महायुतीकडे असताना माढ्यामध्ये महाविकास आघाडीला यश.

पंढरपूर (दि.6) प्रतिनिधि - बालाजी फुगारे.


    माढा लोकसभा मतदारसंघ हा सातत्याने चर्चेत राहिलेला मतदार संघ आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली होती मात्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने याचा गंभीर्याने विचार केला नाही 

व मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली नाही. मात्र मोहिते पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करत लोकसभेसाठी उमेदवारी मिळवली व तब्बल एक लाख वीस हजार चे मताधिक्य घेत मोहिते पाटील विजय झाले आहेत. 

    वास्तविक पाहता माढा लोकसभा मतदारसंघ हा माहितीसाठी सुरक्षित मतदारसंघ होता. माहितीतील घटक पक्ष असणारे अजित पवार गट भाजप व शिंदे गटाचे आमदार या मतदारसंघात असल्याने भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित होता. माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे होते. माढा विधानसभा चे आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे अजित पवार यांचे समर्थक तर माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते हे भाजपचे उमेदवार होते सांगोला विधानसभा मध्ये शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे नेतृत्व करतात तर मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे हे रंजीत सिंह निंबाळकर यांच्याबरोबर होते. फक्त फलटणचे विधानसभेचे उमेदवार यांचा अपवाद वगळता माढा लोकसभेतील पाच मतदारसंघ हे माहित इकडे असताना मोहिते पाटील यांनी मात्र मोठ्या राजकीय खेळी खेळत व शरद पवार यांच्या विषयी असणाऱ्या सहानभूतीचा फायदा घेत माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तुतारी वाजवली आहे. 

  विधानसभा मतदारसंघ आणि मोहिते पाटील व निंबाळकर यांना मिळालेली मते. 

माढा मोहिते पाटील 1,22,570 निंबाळकर 70,055,माळशिरस मोहिते पाटील1,34,279 निंबाळकर 64,145,सांगोला मोहिते पाटील 84,556 निंबाळकर 89,038 फलटण मोहिते पाटील 93,633 निंबाळकर 110561, माण मोहिते पाटील 86,059 निंबाळकर 109414, निंबाळकर यांना फलटण ,मान व सांगोला मतदार संघातून मताधिक्य मिळाले असले तरी मोहिते पाटील यांनी करमाळा,माढा व माळशिरस या मतदारसंघातून घेतलेले मताधिक्य हे विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

   मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या निवडून सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघातून विधानसभेचे सुद्धा गणित बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments