पंढरपूर(दि.7)प्रतिनिधी - बालाजी फुगारे
पंढरपूर तालुक्यांमध्ये गुरुवार दिनांक 6 जून रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी रात्री मेगर्जंसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची पंढरपूर शहरांमध्ये मोठी तारांबळ उडाली. सकल भागामध्ये पाणीच साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ग्रामीण भागात ही जोरदार पाऊस पडल्याने ओढे, नले वाहू लागले होते. महसूल विभागाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील विविध सर्कलमध्ये काल पडलेल्या पाऊसाची नोंद करण्यात आली असून सर्वात जास्त पाऊस पंढरपूर सर्कलमध्ये झाला. पंढरपूर सर्कलमध्ये 131 मिलीमीटर इतका पाऊस झाला. चळे वतुंगत सर्कल मध्ये हे जोरदार पाऊस झाल्याचे नोंद झाली आहे. पंढरपूर तालुक्यांमध्ये एकूण 523
मिली.इतका पाऊस झाला.तर सरासरी 58.11%इतका पाऊस झाला.
करकंब- 35 मिमी
पट कुरोली- 29 मिमी
भंडीशेगाव 41 मिमी
भाळवणी- 22 मिमी
कासेगाव - 48 मिमी
पंढरपूर- 131 मिमी
तुंगत- 93 मिमी
चळे- 87 मिमी
पुळुज 37 मिमी
आजचा एकूण पाऊस 523 मि.मी
सरासरी पाऊस 58.11 मि.मी.
Post a Comment
0 Comments