Type Here to Get Search Results !

पंढरपूर तालुक्यात पुन्हा बिबट्या सदृश्य प्राण्याचा शेळ्यांवर हल्ला

 पंढरपूर(दि.9) प्रतिनिधी बालाजी फुगारे.

  पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे  मागील दोन दिवसापूर्वी बिबट्या सदृश्य प्राण्याने चार ते पाच शेळ्यांवरती हल्ला केला होता. ती घटना ताजी असतानाच रविवारी(दि.9)चळे तालुका पंढरपूर येथील बरड वस्ती भागात राहणारे सुजित गायकवाड यांच्या बोकडावरती बिबट्या सुदृश्य प्राण्याने हल्ला केला आहे. या घटनेने तळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. संबंधित प्राण्याचे ठसे चिखलामध्ये उमटले असून. ते ठसे  बिबट्या सदृश्य प्राण्याचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


     रात्री साडेबारा वाजता ही घटना घडली असून त्यांचे बोकड बिबट्या सदृश्य प्राण्याने फरपटत नेले असल्याचे त्यांनी स्वतः पाहिले.तरी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांनी शक्य असेल त्यांनी आपली शेळ्या, करडे व लहान वासरे,बंदिस्त करून ठेवावीत असे आवाहनही करण्यात आले आहे. वन विभागाचे सचिन कांबळे हे थोड्याच वेळामध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत.तरी शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांचे काळजी घ्यावी. नदीकाठच्या परिसरामध्ये हा फिरत असण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments