मुंढेवाडी (दि.1) प्रतिनिधी बालाजी फुगारे.
मुंढेवाडी येथील सायली मधुकर मोरे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. छत्रपती शिवाजी विद्यालय मुंढेवाडीची विद्यार्थिनी सायली मधुकर मोरे 96% गुण मिळवत कासेगाव केंद्रामध्ये प्रथम आली आहे.सायलीने 10 च्या बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल मुंढेवाडी ग्रामस्थ तर्फे तिचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंडेवाडी चे सरपंच हनुमंत घाडगे,उपसरपंच अभिमान मोरे,पालक मधुकर मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments