पंढरपूर (दि.15) प्रतिनिधि
तपोवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुळुज, संचलित विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने विठाई वारकरी बाल संस्कार शिबिर २०२४ च्या निमित्ताने,महाराष्ट्रातील थोर वारकरी संप्रदायातील साधू संतांच्या विचाराचे आचरण करणाऱ्या वारकरी बांधवांना ,आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांना विठाई वारकरी गुरुकुल "जीवन गौरव पुरस्कार"तसेच साहित्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लेखक-कवींना 'सेतुबंध साहित्य प्रतिष्ठान' यांच्या वतीने सेतूबंध साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
पुरस्काराचे वितरण ह.भ.प. श्री भागवत महाराज चवरे उपाध्यक्ष,अखिल भाविक वारकरी मंडळ, आंबेकर आजरेकर फड, मठाधिपती, पंढरपूर यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील तसेच जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभणार आहे.
*
पुरस्काराचे मानकरी*
विठाई वारकरी जीवन गौरव पुरस्कार
ह. भ. प. श्री चिंतामणी महाराज घोडके, रा.पांढरेवाडी व ह.भ.प. श्री.कबीर फुगारे गुरुजी चळे.
विठाई कृषी जीवन गौरव पुरस्कार
ह. भ. प. श्री बलभीम बापू पाटील खरसोळी
सेतूबंध पुरस्कार प्राप्त साहित्यिक
योगिनी राऊळ, विठ्ठल गावस, गजानन फुसे, ज्ञानेश्वर जाधवर, हरिश्चंद्र पाटील, आबासाहेब पाटील, शिवाजीराव शिंदे, श्रीकांत पाटील, रामचंद्र इकारे
विठाई साहित्य साधना पुरस्कार
राजेश पवार, जैनुद्दीन मुलानी, शिवाजी वाघमारे
विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूर ही एक वारकरी शिक्षण संस्था असून गेल्या 5 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर अध्यात्म तसेच साहित्य सेवा करत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, साधक विद्यार्थी यांना घडवण्याचे महान कार्य करत आहे.
अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विठाई वारकरी गुरुकुल तीर्थक्षेत्र पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष संत साहित्य अभ्यासक ह.भ.प. श्री सूर्याजी महाराज भोसले व तपोवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ह.भ.प. सौ. माधुरी सूर्याजी भोसले पंढरपूर यांनी केले आहे. दिनांक १८ मे रोजी सकाळी ठीक ११ वा. विठाई वारकरी गुरुकुल, घोरवडेश्र्वर मठ, विसावा मंदिर पासून उत्तरेला नगरपालिकेच्या ग्राउंड पाठीमागे वाखरी येथे होत आहे..

Post a Comment
0 Comments