चळे (दि.21)प्रतिनिधी - बालाजी फुगारे.
चळे ता. पंढरपूर येथील श्री दर्लिंग विद्या मंदिर व भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयचा इयत्ता बारावीचा विज्ञान आणि कला शाखेच्या 100%निकाल लागला आहे.विज्ञान शाखेमध्ये मुलांनी बाजी मारली तर कला शाखेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे..
१२ वी विज्ञान शाखा प्रथम क्रमांक-राजोपाध्ये विश्वेश संतोष-86.33%.,द्वितीय क्रमांक वाडेकर प्रवीण नितीन 82.17%,तृतीय क्रमांक घोडके शिवम दरिबा 81.17
इ.१२ वी कला शाखा प्रथम क्रमांक मोहिते उषा चंद्रकांत 71.67% द्वितीय क्रमांक वाघ वैष्णवी हरी 70.83%, तृतीय क्रमांक कदम अपर्णा पंढरी -70.17%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिषदादा गायकवाड प्राचार्य जे.बी.गायकवाड पर्यवेक्षक टी.एम.भोसले यांनी केले.
महाविद्यालयाने मागील अनेक वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
Post a Comment
0 Comments