चळे (दि.1) प्रतिनिधि.
चळे तालुका पंढरपूर येथील विद्यमान उपसरपंच अमोल नारायण मोरे (वय.30)यांचे शुक्रवार दि.1रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी दवाखण्यात उपचार सुरू होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई,बहीण असा परिवार आहे.श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुहास मोरे यांचे ते चुलत बंधू होत.
अमोल मोरे यांनी चळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2021 मध्ये प्रभाग क्रमांक 4मधून दर्लिंग ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. व ते त्या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते.काही वर्षांपूर्वीच त्यांची चळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड झाली होती.त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर रात्रौ 1.30ते 2.30च्या दरम्यान अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

Post a Comment
0 Comments