Type Here to Get Search Results !

नेहरू युवा मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

चळे - (दि.14) प्रतिनिधी 

     8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चळे तालुका पंढरपूर येथील दर्लिंग विद्यामंदिर व भास्कर अप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय येथे कोंढारकी येथील राजेंद्र फुगारे यांनी नेहरू युवा मंडळाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती व श्री दलिंग विद्यामंदिर भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयचे संस्थापक अध्यक्ष हरीश दादा गायकवाड हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. 

   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  हरिषदादा गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते बंडू मोरे यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयोजक राजेंद्र फुगारे यांनी आपल्या मनोगत मध्ये कार्यक्रमाचा हेतू सांगत, "वुमन फिट,तो इंडिया फिट "चालल्याने पळण्याने आरोग्य सुधारते असा सल्ला दिला.

     नेहरू युवा मंडळच्या वतीने प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रमाणपत्र,टी-शर्ट,टोपी व चषक असे बक्षीस आयोजकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले वितरण करण्यात आले.

 


यावेळी सामाजिक कार्यकर्ते आम आदमी पार्टीपंढरपूर तालुकाध्यक्ष बंडू मोरे,चळे विविध सेवा सहकारी संस्था नंबर दोनचे चेअरमन श्रीनिवास बनसोडे, कोंढारकीचे ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, गणेश दांडगे, हनुमंत पाटील, रमेश वाघ, नेहरू मंडळाचे अध्यक्ष राहुल नागणे,आप्पासो दांडगे, प्राचार्य जे बी गायकवाड यांच्या सह  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीप्रसाद मोहिते मोहिते यांनी केले तर आभार पर्यवेक्षक तुकाराम भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments