चळे (दि.२१).प्रतिनिधी.
चळे येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर दिनांक 20 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी या दरम्यान चळे येथे सुरू आहे. काल दि.20रोजी या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.श्रमसंस्कार शिबिरा अंतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वाटंबरे येथील श्री फडतरे सर यांच्या समाजप्रबोधन पर कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती प्रा. सुरेश बनसोडे यांनी दिली आहे.तरी सर्व ग्रामस्थानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments