चळे(दि.४).प्रतिनिधी.
मोहोळ मतदार संघातील सतरा गावांमधील चळे या गावची पंढरपूर ला जोडणाऱ्या चळेपाटी ते चळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.त्यातच आता ऊस वाहतूक सुरू झाली आहे.जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चारचाकी अन् दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनाही खूप कसरत करत जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ऊस वाहतूक बंद करण्याचा ही निर्णय ऊस वाहतूकदारांनी दिला होता.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी लोकवर्गणीचा पर्याय निवडला होता. मात्र ही बाब मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांना समजताच त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत चळेपाटी ते चळे या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. आज सोमवार दि.4डिसेंबर रोजी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री लवटे यांनी चळे पाटी ते चळे या रस्त्याची पाहणी करून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याचे परिवर्तन न्यूज शी बोलताना सांगितले.
त्याचबरोबर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कारखानदार ही पुढे सरसावले असून सिताराम कारखान्याच्या वतीने बर्ड वस्ती ते चळे या रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे काढून तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सुरू करण्यात आले आहे.इतर कारखान्यांनी ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मदत देण्याचे आश्वासन दिले असून तळे ग्रामपंचायत ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढे सरसावली असून ग्रामपंचायत च्या माध्यमातून ही दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.
आ. माने यांनी 40वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला.
एकंदरीतच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र सध्या तरी किमान रस्त्याची झाल्यास वाहतूक करणे थोडे सोपे जाईल या भावनेतून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.आमदार यशवंत माने यांना नागरिकांच्या अडचणी समजतात त्यासाठी तातडीने उपाययोजना करत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल चळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.यापूर्वीही आमदार माने यांनी 1200कोटी रुपयांचा निधी खेचून आणत मोहोळ मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेला चळे येथील चळे ते बरड वस्ती या पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून आमदार माने यांनी तब्बल चार कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.संबंधित कामाची वर्क ऑर्डर लवकरच निघून ते काम सुरुवात होणार असल्याचेही आमदार माने यांनी परिवर्तन न्यूज बोलताना सांगितले. एकंदरीतच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने चळे ग्रामस्थांमधून आमदार माने यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments